रामदेव बाबांच्या हस्ते पार पडला महाराष्ट्रातील पहिल्या आचार्यकुलम् विद्यालयाचा कोनशीला समारंभ गुरू श्री रामदेव बाबा यांच्या संकल्पनेतून व अमनोरा नॉलेज फाउंडेशनच्या मदतीने पुण्यातील मांजरी येथे महाराष्ट्रातील पहिले ‘आचार्यकुलम्’ विद्यालय उभारण्यात येणार आहे. या विद्यालयाचा कोनशीला समारंभ आज पार पडला. चार एकर परिसरात साकारण्यात येणा-या या विद्यालयात पूर्णत्वास आल्यानंतर सुमांरे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती नवीन पिढीमध्ये रुजावी, तिची माहिती या नव्या पिढीला व्हावी यासाठी ‘आचार्यकुलम्’ विद्यालय विशेष प्रयत्न करेल. ‘आचार्यकुलम्’ या योजने अंतर्गत गुरू श्री रामदेव बाबा यांचा संपूर्ण भारतात सुमारे ६०० विद्यालये उभारण्याचा मानस आहे. ...